चीज केक

  • १किलो मागर(लो फॅट) क्वार्क/ चक्का/ केफिर लेबनी चीज/ कमी फॅटवाला चक्का किवा लेबनी चिज घावे.
  • २०० ग्राम बटर/मार्गारिन
  • २५० ग्राम साखर
  • १०० ग्राम मैदा, १चिमूट मीठ
  • ६ अंडी
  • २ चमचे वॅनिला अर्क
  • १चमचा बेकिंग पावडर
  • १चमचा लिंबाचा रस+ १/२ लिंबाची साल किसून
  • २चमचे रम मध्ये भिजवलेले मूठभर बेदाणे
  • १/२ चमचे ब्रेडक्रम्स किवा मैदा
अडीच तास
६/७ जणांना

रममध्ये बेदाणे भिजवून केक ची पुढची कृती करायला घेणे. रम नको असेल तर नुसते बेदाणेही घालता येतील. बेदाणेच नको असतील तर बिनाबेदाण्यांचाही केक करता येईल. 
बटर भरपूर फेटणे. साखर घालून फेटणे, अंडी घालून फेटणे, वॅनिला अर्क घालून फेटणे. लिंबाचा रस व साल घालून फेटणे. मैदा+बेकिंग पावडर+ चिमूटभर मीठ घालून फेटणे. क्वार्क/चीज /चक्का घालून फेटणे. रममधील बेदाणे घालणे व सारखे करणे.
केकच्या मोल्डला बटर लावणे. त्यावर ब्रेडक्रम्स/मैदा भुरभुरणे. मोल्ड आपटून जास्तीचा मैदा/ब्रेडक्रम्स बाहेर काढून टाकणे.
अवन प्रिहिट करायचा नाही. १६५ ते १७० अंश सेल्शियस ला ७० ते ८० मिनिटे बेक करणे. केक झाला की अवन बंद करून ५ ते ७ मिनिटे केक अवन मध्येच राहू देणे व नंतर बाहेर काढणे.

अनेकानेक प्रकारच्या चीजकेकच्या रेशिप्या उपलब्ध आहेत त्यातील ही एक पाकृ.

चक्का किवा लेबनी चीज किवा मागर क्वार्क यातील काहीही एक उपलब्धतेनुसार घेता येईल.कमी फॅटवाला चक्का किवा लेबनी चिज घावे.

त्सेंटा आजी