दिवस मोजू रोज
मोजू मिनिटे तास
पुन्हा भेटण्याची आस,
क्षितिज दूर दूर पापणीत.
श्वासांचा कल्लोळ
दोघा दोघांचा कळेल
जेव्हा दुरावा गळेल,
लय वाढती सतत हृदयात.
सांगायचे काही
बोलायचे काही
अंतर असे की,
असावेच उशीत रिसतात.
विचारांचे काहूर
उगी हुरहूर
नीज कैसी आता,
सुया अगणित अंधारात.