मन:स्पदंन--"निर्माण"
घडविले सारे विश्व मी जरी असे ते नश्वर ।
कुणी म्हणे परमात्मा मजला कुणी म्हणे परमेश्वर ।।
प्रथम निर्मिला अंतराळ व्यापून टकिल्या दाही दिशा ।
काही होते ग्रह अन् काही होत्या तारका तशा ॥
निवडून एका तारकेस 'सूर्य' असे नामविले ।
मज प्रिय त्या ग्रहास तिमीरापासूनि दूर केले ॥
मग त्या प्रियेस अनन्य करावयाचे ठरविले ।
जलवायू कणांकणांत निर्मिले तिला समृद्ध केले ॥
आता निर्मिले वृक्ष तिजला सुंदर बनवाया ।
निर्मिले तद् पशू-पक्षी तिचा नाद ऐकाया ॥
सर्व उत्कृष्ठ होवोनी मन माझे तृप्त होईना ।
नवं निर्माण करावयाची ओढी काही केल्या शमेना ॥
परम् विचारांती मोठा अविष्कार केला ।
सर्वगूणसंपन्न असा 'मानव' मी निर्मिला ॥
मज जवळील सर्व अलंकारांनी त्यास सजविला ।
इतर प्रियजनांच्या निर्वाहाकरिता पृथ्वीवरी धाडिला ॥
परि मजला कळेना त्याने त्यांचाच संहार का सुरू करविला ।
मी मग कंप नि महापूर जश्या संकटांनी त्यास ईशारा देधिला ॥
ते देखील त्यास न कळले,
उलट विचारी मजला-काय मी मनी असे दडविले ।
लक्षात असू दे तू फक्त,
" या निर्माणाला नवं ठेवण्यास तुजं हाती सोपविले " ॥
- निलमन