सुखदुःखाना जेंव्हा जेंव्हा
सावरणारा हवा होता
तेंव्हा तुझा हात
माझ्या खांद्यावर होता
नेहमीच साधा स्वयंपाक करू नये
कधी बदलानाही वाव द्यावा
चमचमीत पदार्थाच्या भुकेला
थोडासा तरी भाव द्यावा
चवीन खाणारं कुणी असेल
तर बनवण्याला अर्थ आहे
कुणाचच पोट तृप्त करणार नसेल
तर पुरणपोळी सुद्धा व्यर्थ आहे
कुणीतरी लागत
आपल्याला खादाड म्हणणार
खादाड म्हणताना
आपल्या आवडीनिवडी जपणार
घाईत कुकर उघडला
वाटलं भात शिजला होता
पाहते तर काय , तो
चांगलाच पाण्यात भिजला होता