जीवनप्रवास..

गंध जीवनाचा

दुःखाला धुडकावून देतो

मुक्या भावनांशी

स्पर्श खेळून जातो

ध्यास क्षितिजाचा

वर्म आपुले दावतो

अस्पष्ट होते चित्र सगळे

श्वास वाकुल्या दावतो

अंधारी येते नजरेत

मेघ समोर धावतो

काळाचे औषधही

दुर्दम धीर हिसकावतो

मातीत मिसळतो देह उभा

आकाश कहाण्या सांगतो

निराशाच उरते मातीत मग

आणि जीवनप्रवास संपतो.