काल रात्री पावसाने

काल रात्री पावसाने
बरेच उधाण घातले होते
धरतीचा कण आणि कण भिजला होता
मी सुद्धा भिजलो होतो
डोळ्यांतील पावसाने
पण हे कोणाला कळलेच नाही
गालावरील पाणी
पावसाचे कि अश्रूंचे?
नाहीतर अश्रू लपवण्यासाठी
हसावे लागले असते
डोळ्यांवर बांध घालतांना
काळजाला जळावे लागले असते.