सोडून वाट चालतो फकीर अंतरीचा
सोसवेना म्हणे मज आता भार, तुझ्या निर्जीव कलेवराचा
दगडास व्यर्थ आळविले भोगूनी हाल वनवास
दगडाचे शेवटी मातीशी नाते, होते माझे उगाचेच अट्टहास
हिशेबी बेड्या, शून्यांच्या नोंदी, जमेत राहिली फक्त राख
आज तीच फासून सर्वांगाला तोडतो सारे तुझे हलकट पाश
आता या फकिराविना तुझा यापुढचा प्रवास
लखलाभ तुला मातीचा उत्कट वास आणि आलिंगनांचे गळफास!
_______________________________________________
प्रकाश