अनुत्तरित

आज नियतीने माझ्याशी
पुन्हा खेळ खेळला
दोन घडीचा डाव
अर्ध्यावरच मोडला
कळत नाही असे का?
पुन्हा पुन्हा घडते
दोन जिवांचे नाते
असे का अवखळते
का मला अधिकार नाही ?
कुणासाठी झुरण्याचा?
तीच्या स्वप्नांच्या जगात
हक्कने जाउन बसण्याचा
पण हे प्रश्न
पुन्हा अनुत्तरीतच राहतात
भरल्या ओंजळीचे होते रुपांतर
माझ्या रिकाम्या हातात
हातावरील रेषा सुद्धा
आता माझ्याकडे बघुन हसतात
नियतीशी किती भांडशील ?
भरल्या डोळ्यांना विचारतात.................