दिवाळीचा आशावाद...

आली पुन्हा प्रकाशमान दिवाळी

 जशी अस्सल सोन्याची झळाळी

दूर होवू दे संकटांची छाया काळी

नष्ट होवू दे समस्यांची दाट जाळी

पसरू दे ज्ञानाचा प्रकाश आभाळी

खुलू दे दु:खी मनांची कळी

भरू दे आनंदाने प्रत्येकाची झोळी

आली प्रकाशमान दिवाळी

आली प्रकाशमान दिवाळी