चीझ-बटाटा सॅंडविच टोस्ट

  • पाव, उकडलेले बटाटे, चीझ, लोणी, चाट मसाला.
  • ओले खोबरे, हि. मिरच्या, कोथिंबीर, चवीपुरती साखर, मीठ.
५ मिनिटे

१) पावाच्या तुकड्याला (स्लाईस) दोन्ही बाजूने लोणी लाऊन घ्यावे.

२) उकडलेल्या बटाटयाचे काप (चकत्या) करून घ्यावेत.

३) ओले खोबरे, हि. मिरच्या, कोथिंबीर, चवीपुरती साखर, मीठ एकत्र वाटून घ्यावे. (चटणी)

४) सॅंडविच मेकर ( इलेक्ट्रिक / गॅस ) ला दोन्ही बाजूना थोडे लोणी लाऊन घ्यावे. (नाहीतर पाव चिकटतो / कडक होतो. )

५) एकाबाजूवर लोणी लावलेला पाव ठेऊन, त्यावर बटाटयाचे काप ठेवावेत. त्यावर थोडे मीठ व चाट मसाला भुरभुरावा.

६) त्यावर चीझ किसून घालावे. दुसऱ्या पावाच्या तुकड्याला चटणी लाऊन, तो वर ठेऊन, सॅंडविच मेकर बंद करावा.

७) गॅसवर दोन्ही बाजूने उष्णता द्यावी. ( मध्येच उघडून पाहिले तरी चालते. )

खरपूस झाल्यावर गरम गरम खावे.

सॅंडविच तयार करून ठेवले तर एकामागून एक पटापट भाजता येतात.

सॅंडविच मेकर मध्ये दाबले जात असल्याने आपोआपच त्रिकोणी आकारचे २ तुकडे होतात.

आवडत असल्यास चटणीबरोबर थोडा टोमॅटो सॉसही लावावा.

माझा प्रयोग