माझी लहानपणीची पहिली मराठी कविता...
काय सांगू तूला मी, भिजलेली पाऊलवाट ती
एकटाच फिरतो झाडातून, शोधतो तूला फुलांतून.
फूले जवळ येताच, तू शेजारी नसताच
पडे पाऊस गालावर, आठवण तूझी येताच.
वादळ ऊठे डोक्यात, नयने मिटून घेताच
धाराही मग वाहतात, बंद डोळ्यातून त्याच.
शब्द तो जीवनातून गेला, जाताना महत्त्व पटवून गेला
ताई तुझ्या जाण्याने, जगण्याचा मोह का ग हरवला.
आठवण तुझी येते, खुप रडवून जाते
स्वतःला सावरण्याची, शिकवण तुझी आठवते.
पाणी खुप सावरले, दुःख दुर सारले
शिकवणीतून तुझ्या मी, जिवंत तुला ठेवले.
असेच पुढे जाताना, वाटे परत लहान व्हावे
तुझ्या प्रेमळ हातांच्या छायेत, दुःखातून स्वच्छ न्हावे...