काजुकंद वडी

  • बारीक रवा १ वाटी
  • साय १/२ वाटी
  • दुध १/२ वाटी
  • ओल्या खोबरयाचा चव १ वाटी
  • साखर २ वाट्या
  • व्होनिला ईसेन्स १/२ चमचा
  • रासबेरी रेड रंग चिमुटभर पावडर
  • साजुक तुप २ मोठे चमचे
  • काजू पोलपाटावर ओबडधोबड केलेले १/२ वाटी
१० मिनिटे
प्रत्येकाला २-२ वड्या १० जणांना

वरील सर्वे साहीत्य हींडालीयम कढईत एकत्र करून गॅसवर ठेवणे. कढईला कडा पांढरया दिसेपर्यनत ढवळणे. त्यानंतर कढई खाली उतरवून गोळा होईपर्यनत ढवळणे. त्यानंतर पोलपाट व लाटणे याला तुप लावून लाटणे व लाटून झाल्यावर त्यावर शिल्लक राहीलेली काजू पावडर पसरवणे व परत लाटणे, फीरवणे. त्यानंतर वड्या पाडणे.

नुसत्या खायच्या.

माझी आई