प्रत्येक जन अश्वथामा

अश्वथामा हे हजारो वर्ष पूर्वी घडलेल्या अथवा लिहिल्या गेलेल्या महाकाव्यातील एक पात्र.    अजून सुधा हे पात्र जिवंत आहे असे मानले जाते, जन्मापासून कपाळावर असलेल्या अमर मण्यामुळे अश्वथाम्याला कधीच मरण येणार नव्हते, कदाचित गंगा पुत्र भीष्मा सारखा त्याला इच्छामरण मिळणार असेल. पण युद्ध संपल्या नंतर श्री कृष्णाने तो अमर मणी काढून घेतला, आणि त्याच्या मुळे त्या मण्याच्या जागी त्याला मिळाली एक सतत वाहणारी एक जखम, आणि वरती एक अभिशाप, की या वाहणाऱ्या जखमे सोबत त्याला फक्त जगायचे होते, त्याला कधीच मरण येणार नव्हते. असे मानले जाते की अश्वथामा अजून सुधा जिवंत आहे, आणि ती जखम सुद्धा.

मी विचार करतो की जर अश्वथामा अजून सुद्धा जिवंत असेल आणि ती जखम अजून सुद्धा जर ताजी असेल तर ती जखम त्याला फक्त ऐका शारीरिक इजे सारखी असेल का?    मला वाटते नाही... कारण ती फक्त ऐक शारीरिक इजा नाही तर ते आहे ऐक शल्य.

ते शल्य आहे आहे पराभवाचे, फक्त युद्धातच नाही तर जीवनात हरल्याचे, जे पाहिजे, जे मिळाले नाही त्याचे शल्य, आपल्या जन्मदात्याला युद्धात वाचवू न शकल्याचे शल्य.    म्हणूनच मी ती जखम फक्त ऐक जखम मनात नाही. जर अजून सुद्धा तो वीर जिवंत असेल तर तो माझ्या नजरेत खूप महान आहे.    कारण मरण सर्व दुखातून तसेच सुखातून सुटण्याचा राजमार्ग आहे. आणि तो मार्ग त्या वीराच्या जीवनात कधीच येणार नाही. तो जगात राहील आणि नरक यातना सोसत राहील.

ही झाली महाभारताची गोष्ट.. कदाचित दंत कथा..

पण मला वाटते की अश्वथामा नावाचे पात्र आपण सर्व जन आपल्या सोबत घेऊन वावरत असतो, जगत असतो.

कारण त्या अश्वथाम्या सारखे कित्येक शल्य आपल्या मनात असतात जे की सतत वाहत असतात, भळभळत असतात, त्यावर खपली कधीच चढत नाही,    त्या सर्व जखमे चे प्रकार सुद्धा नीरनिराळे, कधी काळी झालेला किंवा सतत होत असलेला अपमान,    आपल्या आई ला मरायच्या आधी कधी सुख नाही देऊ शकलो याची जाणीव, वडिलांची जाणते किंवा अजाणते पणी केलेली अवेहलना, आणि त्या नंतर कधीच माफी मागायची संधी मिळाली नाही याचे दुख, कुठल्यातरी प्रिय वक्ती चा आपल्या समोर झालेला मृत्यू, आणि आणि आपण त्याला वाचवू न शकल्याचे दुख,    दिलेले वचन पूर्ण न करू शल्याचे दुख, आपल्या हितचिंतकाला वैरी म्हणून हिनवले याचे दुख.    ही यादी कधीच पूर्ण होणार नाही, जेवढी माणसे तेवढ्या जखमा,    तेवढीच त्यांची रूपे,    कधी छोटी कधी मोठी, प्रत्येकाला आपली जखम मोठी. प्रत्येक जन अश्वथामा.

तरीही आपण त्या अश्वथाम्या पेक्षा सुदैवी आहोत, कारण मरण नावाचे रामबाण औषध आपल्या कढे आहे, तो औषध आपली जखम संपवते, यातना संपवते, आणि देते मागे उरलेल्या माणसाना ती जखम आणि यातना ज्यांनी कधी आपल्याला दुखवले आणि माफी मागण्याची वेळ संपली होती