पालक बाँब्ज

  • १ वाटी पालक प्युरी,
  • १ वाटी ब्रेडचा चुरा,
  • १ वाटी किसलेले चीज,
  • धणे-जिरे पुड, गरम मसाला, मीठ आवडीप्रमाणे
  • तळायला तेल.
२० मिनिटे
साधारण मध्यम आकाराचे १०-१२ बाँब्स बनतील.

१. पालकप्युरीमध्ये ब्रेडचा चुरा आणि बाकी मसाला (चीज सोडून)घालून चांगले मिसळावे.
२. साधारण कटलेटसाठी लागते तसे मिश्रण बनवावे.
३. त्या मिश्रणाचे हातावर छोटे छोटे चपटे गोळे करावे. मग त्यांत थोडे थोडे चीज भरून त्याला पाणी लावून लावून त्याला बाँब्सचा आकार द्यावा.
४. हे बाँब्स तळून घ्यावेत. सॉसबरोबर खायला द्यावेत.

मिश्रणाच्या आवश्यकतेनुसार ब्रेडचा चुरा कमीजास्त घालावा.
प्युरी करतानाच पालकातले जादाचे पाणी काढून टाकावे, म्हणजे ब्रेडचा चुरा कमी लागतो. त्यामुळे, बाँब्सचा रंग छान हिरवा राहतो आणि चवही छान येते.
आदल्या दिवशीचे उरलेले पालकपनीर वापरूनही हे बनवता येते.