आईस्क्रीम शिवाय आईस्क्रीम!

  • मारी बिस्कीट चुरा
  • दूध
  • ड्रिंकिंग चॉकलेट/ बोर्नव्हीटा
  • सुक्या मेव्याचा भरड चुरा
  • आवडीप्रमाणे चेरीज, टुटीफ्रुटी, चॉको फ्लेक्स/ चॉकोलेट शेव्हीन्ग्ज/ चॉकोलेट सॉस, जेम्स गोळ्या
१५ मिनिटे
२-३ जणांसाठी

ही कृती अतिशय झटपट होणारी, लहान मुलांनाही करता येणारी आहे.
दुधात बोर्नव्हीटा / ड्रिंकिंग चॉकलेट विरघळवून घ्यावे, ते मिश्रण मारी
बिस्कीट चुरयात घालून नीट मिसळावे. घट्टच ठेवणे, फार सरसरीत करू नये! त्यात सुका मेवा मिसळून
फ्रीज मध्ये गार करावे. देताना त्यात आवडीप्रमाणे चेरीज, टुटीफ्रुटी, चॉको फ्लेक्स/ चॉको शेव्हीन्ग्ज , जेम्स गोळ्या वगैरे घालून मुलांसाठी
तयार! (मोठ्यांनी देखील खायला हरकत नाही! )
मुद्दाम प्रमाण द्यायचे टाळले आहे. मारी ऐवजी ग्लुकोज बिस्किटे वापरायलाही हरकत नाही. फ्रीजमध्ये गार केल्यावर हा पदार्थ आईस्क्रीमसारखाच लागतो.

आईस्क्रीमच्या कोनांमध्ये घालून दिल्यास अजून मजा येईल!

प्रयोग