पत्त्यांचा बंगला

राजाच्या आधारावर राणी उभी राहिली, जोडी त्यांची जमली

अशाच जोड्या जमून घराची नीव उभी राहिली



मजल्या वरती चढले मजले, चढावा जसा मनोरा

राजा भोवती उभा राहिला, स्वप्नांचा डोलारा



बेसावध त्या क्षणी क्रूर ती, झुळूक वाऱ्याची आली

अर्ध्या डावामधूनी अचानक राजाला घेऊन गेली



विस्कटला, फिसकटला सगळा डाव जो होता रंगला

क्षणात एका उद्ध्वस्त झाला, पत्त्यांचा बंगला

read more @ दुवा क्र. १