सफरचंदाचा मुरांबा / जॅम

  • मध्यम आकाराची पिकलेली ३-४ सफ़रचंदे
  • साखर
  • वेलदोडा पूड चवीप्रमाणे
  • लवंगा ३-४
३० मिनिटे
गोडाची आवड असल्यास फार काळ न टिकणारा पदार्थ!

प्रथम सफरचंदे स्वच्छ धुवून, कोरडी करून त्यांची साल काढून घ्यावी. किसणीवर व्यवस्थित किसावीत. आता किसलेल्या सफरचंदाच्या प्रमाणाएवढीच साखर घेऊन त्या साखरेचा एकतारी पाक तयार करावा. साखरेचा एक तारी पाक म्हणजे साखरेच्या दुप्पट पाणी घेऊन पाक
करायला ठेवावा. उकळी आली की गॅस मंद करावा. २ मिनिटे चांगले उकळावे. (मी ह्या पाकातली एक्स्पर्ट नाही...  त्यामुळे चुभूदेघे)
पाक तयार झाला की त्यात सफरचंदाचा कीस, लवंगा घालून मंद आंचेवर कीस चांगला शिजू द्यावा. शेवटी वेलदोडा पूड घालावी. थंड झाल्यावर स्वच्छ कोरड्या बरणीत/ डब्यात भरून फ्रीज मध्ये ठेवावा.

पोळी, ब्रेड इत्यादीबरोबर खायला देता येणारा हा पौष्टिक पर्याय आहे.

आई