" प्रतिमा "

यत्न करतो हरतऱ्हेने पण तिची कळी कधी खुलतच नाही

सर्व सांगतो मी मनातले अन ती एका शब्दानेही बोलतच नाही...

तिचा हा अबोला, तिचे हे मौन पेटवून टाकते माझे रक्त

कितीही चिडलो मी तरी न रागावता ती गोड हसते फक्त...

तिचे हे गोड हास्य कायमच मला आधाराचा हात देते

भयाण औदासिन्यात ही नेहमी आशेची वाट दाखवते...

ती समोर असतानाही मी तिच्याच आठवणीत दंग होतो

कुंचला मनाचा घेउनी प्रतिमेत तिच्या रोज नुतन रंग भरतो...

तिच सोबती तिच सखी तिच एक मित्र आहे

दुखः एव्हढेच आहे ती फक्त एक चित्र आहे...

सत्य वाटते नेहमीच जरी ती एक स्वप्न आहे... पहाटे पहाटे पडलेले..

आई म्हणते पहाटे पडलेली स्वप्ने खरी होतात ....

कधी अवतरेल का ती स्वप्नातुनी सत्यात..

कधी ऊतरेल का ती प्रतिमेतुनी वास्तवात..

अन नाही आली तरी प्रेम माझे कमी ना होइल तसुभर...

शेवटी सगळेच म्हणतात ना " वास्तवाहुनी प्रतिमा सुंदर "...