" सल "

दुःख याचे ना मला सखे

सगे- सोयरे आप्त सारेच गेले विसरुनी...

दुःख एव्हढेच आहे सखे

तयांना न विसरलो मी अजुनी...

वाटते नेहमीच मजला

मुक्त जाहलो सर्व बंधातुनी...

छळतात तरी काही अदृश्य गाठी

सखे जरी ती वीण गेली ऊसवुनी..

रमुनी सर्व ह्या जगती सखे

काही रिक्त भाव असे ऊरी...

सांगतो फक्त तुजला सल हे हृदयातले

लपवले जगापुढती डोळ्यात जरी....