पेरूची कोशिंबीर

  • दोन मध्यम आकारचे पिकलेले पेरू . कच्चे अथवा जास्त पिकलेले नकोत.
  • साय असलेले एक वाटी थंड दही. फार आंबट नको. दही आंबट असल्यास पाव वाटी दूध.
  • एक हिरवी मिरची. बेताची तिखट.
  • साखर चार चमचे अथवा जितके गोड हवे त्याप्रमाणे.
  • अर्धा चमचा मीठ.
१० मिनिटे
चार माणसांना एक्दाच . मोठ्या प्रमाणावर करता येईल.

प्रथम पेरुचा बियांचा भाग पूर्णपणे काढावा. साले काढू नयेत. मग त्यांच्या बारीक फोडी करून ठेवाव्या. सायट्याचे थंड दही वरीलप्रमाणे चमच्याने फेटून घ्यावे‍ पाव वाटी दूध (थंड) त्यात घालावे. नंतर हिरवी मिरची अर्घा चमचा मिठा बरोबर ठेचून बारिक करावी. मग कापलेल्या पेरूच्या फोडी , दही, व मिरची एकत्र करून मिश्रण ढवळावे. थंड नसल्यास पंधरा मिनिटे फ्रीझमध्ये ठेवावे. शोभेसाठी वरून डाळिंबाचे दाणे घालावे व वाढावे. ज्यांना लवकर सर्दी होत नाही त्यांना खायला हरकत नाही. कोथिंबीर हवी असल्यासच घालावी .
                             ही कोशिबीर फारच स्वादिष्ट लागते. पिकलेल्या पेरुचा वास फार छान लागतो.

  ह्या कोशिंबिरी बरोबर (मोठ्या प्रमाणावर केल्यास ) पुऱ्या फार चांगल्या लागतात. अर्थातच ही आपापली आवड आहे.

ऐच्छिक