झटपट कोलंबी भात

  • ३ वाट्या बासमती तांदुळ (१ तास आधी धुऊन निथळून घ्यावा), ६ वाट्या पाणी (प्रमाण दुप्पट असावे)
  • २ मोठे कांदे (बारीक चिरून),
  • १ वाटी मोठी सोललेली कोलंबी,
  • ७-८ लसुण पाकळ्या (बारीक वाटुन), १-२ लिंबांचा रस, तेल,
  • ४ लवंग, ४ मोठे वेलदोडे (काळे).
  • मसाल्यासाठी-
  • १०-१२ काळे मिरी, २-३ दालचिनीच्या काड्या, २ लवंग,
  • १ चमचा खसखस, २ चमचे धणे, १०-१२ सुक्या लाल मिरच्या, १०-१२ काजू.
४५ मिनिटे
४-५

१) प्रथम कोलंबीला लसुण, मीठ आणि हळद लावून ठेवावी.

२) सगळा मसाल्यासाठी दिलेले जिन्नस मिक्सरवर बारीक वाटून घेणे. जाडसर असेल तर थोडेसे पाणी घालावे. (खुप नको).

३) जाड बुडाच्या पातेल्यात २ मोठे चमचे तेल तापवून त्यात लवंग आणि वेलदोड्याची फोडणी करावी. त्यावर कांदा टाकावा   व  लालसर होइपर्यंत परतावा. आता कोलंबी टाकून एक वाफ काढावी.

४) मग त्यात वाटलेला मसाला घालून छान तेल सुटेपर्यंत परतावा. (करपून देऊ नये)

५) तांदुळ घालुन परत २-३ मिनीटे परतावे. त्यात ६ वाट्या गरम पाणी घालावे. चवीनुसार मीठ घालावे. जाकण ठेऊन मंद आचेवर शिजवावे.

६) शेवटी लिंबांचा रस घालून ढ्वळावे.

१) तेलाऐवजी तुप वापरु शकता.

एका मासिकात वाचली होती.....