मुंबई लोकल चा तो प्रवास
रोजच ८ : ३५ चा अट्टहास
तिचाच हवा रोज सहवास
नाहीतर.. होतो शेवटापर्यंत उभ्यानेच प्रवास
मग काय?
माझ्या डोक्यावर त्याच डोकं
त्याच तेल मला.....
त्याच्या पायावर माझा पाय
माझं वजन त्याला.
मागून धक्का पुढून धक्का
ह्याच ढोपर त्याला अन....
त्याच कोपरा मला.....
अदजुस्त्मेंट तर करावीच लागणार
नाहीतर... "गप्प बसतो का... की.. इंगा दावू पुडल्या स्टेशनला"
फ् सट क्लास काय, सेकन्ड काय
लगेज पण वापरून बघितला
सगळी कडे तिच स्तिथि...
तिच व्यथा.. अन तिच कथा
असली जरी गर्दी तरी
वेळेवर पोचायची असते हमी
काशीही असली लोकल जरी
तिच्याशिवाय पर्याय नाही
वाटला जरी नको प्रवास
८ : ३५ चाच हवा सहवास
मुंबै लोकल चा तो प्रवास
रोज ८ : ३५ चा अट्टहास