आभाळमाया

वात्सल्याच्या धरतीवर मम जीवन बीज रुजाया
तूच दिली माती आणि तूच आभाळमाया

झेललास पावसाळा जपीत मज उदरी
अंकुरला जीव माझा, तुझ्याच पवित्र पदरी

झेलीत मग उन्हाळे दिलीस मातृत्व छाया
दिली संस्कार माती हा देह आकाराया

त्या दिव्य प्रेमाचे घातलेस खतपाणी
झेलताना वादळे मज आकार दिला कोणी?

तूच दाविला सूर्य, तूच दाविले ऋतू
तूच जगविले मला वाढविलेस तू

हसेन आभाळाला वृद्धिंगत होईन असा
तरी ममतेच्या मृद्गंधा विसरेन मी कसा?

दुवा क्र. १