पोळीचा चिवडा..

  • शिळ्या पोळ्या, कांदा, मिरची, कोथिंबिर, कढीपत्ता, शेंगदाणे, मीठ, साखर, तेल
१५ मिनिटे
अनेक

कांही वेळा पोळ्या (चपात्या) शिल्लक राहातात. त्यांचे काय करायचे हा प्रश्न पडतो. अशा वेळी या पोळ्यांचा उपयोग करून छान चिवडा तयार करता येतो. मागे मी एकटा राहात असताना हा प्रयोग केला होता.

प्रथम पोळ्यांचे साधारण अर्धा इंच रुंदीचे व दोन इंच लंबीचे काप कात्रीने करून घ्यायचे.   कांही मिरच्यांचे बारीक तुकडे करून घ्यायचे. तेल तापवून त्यात अंदाजाने लागतील तेव्हढे शेंगदाणे तळून घेऊन वेगळे ठेवायचे. थोडी कढीपत्त्याची पाने नंतर तळून वेगळी ठेवायची. गार झाल्यावत ती कुरकुरीत होतात व चुरता येतात. नंतर मिरच्यांचे तुकडे हिरवट-पांढरे होईपर्यंत तळून घ्यायचे व वेगळे ठेवायचे. आता उरलेल्या तेलात पोळ्यांचे तुकडे थोडे थोडे करून तळून घ्यायचे.

तळणीचे काम झाले की, तळून घेतलेले सारे पदार्थ एकत्र करायचे. चवीनुसार मीठ-साखर पेरायची. त्यावर चिरलेला कांदा-कोथिंबिर पेरायची. झाला पोळीचा चवदार चिवडा तयार.

एक टिप देतो. हवाबाण हरडे असतील, तर त्याची पूड करून ती मिठाबरोबर पेरावी. त्याने एक छानशी वेगळीच चव येते.   

प्रायोगिक