भाकरकाला

  • ज्वारीच्या दोन शिळ्या भाकऱ्या
  • वाडगाभर दही (फार आंबट नको)
  • फोडणीचे साहित्य : तेल, मोहरी, हळद, हिरव्या/ लाल मिरच्या, जिरे
  • हिरव्या मिरचीचा ठेचा, मीठ, साखर चवीनुसार
५ मिनिटे
२ लोकांसाठी

दही घुसळून त्यात मिरचीचा ठेचा, मीठ, साखर चवीप्रमाणे घालून एकजीव करावे. त्यात भाकरी कुस्करून घालावी. आवश्यकता वाटल्यास अधिक दही/ ताक घालावे.
फोडणी करून ती गार झाल्यावर ह्या काल्यावर घालावी. पुन्हा एकजीव करावे, कालवावे.
नाश्ता, जेवण यासाठी हा एक उत्तम, चविष्ट व पोट भरणारा  पर्याय आहे. 

काहीजण फोडणीत लसूणही घालतात. मात्र तसे केल्यास साखर घालू नये. तळणीच्या मिरच्याही तळून कुस्करून त्यात घालून खाल्ल्या जातात.

आई