नाईल
अजुनही नाईल वाहतेच आहे
कधी हिरवट, निळी झाक
किनाऱ्यावर माडाचा थाट
उडतो एखादा शुभ्र पक्षी
नील जलात मिरवत नक्षी
स्वच्छा सुंदर बिलोली नितळ
जीवनदायिनी सलीला शीतळ
अशी नाईल वाहतेच आहे.
हजारो हजार वर्षे झाली
हजारो हजार वर्षे झाली
प्राचीन संस्कृती नष्ट झाली
अनेक राजवटी आल्या गेल्या
किती लढाया जिंकल्या हरल्या
राजेराण्या ममी झाल्या
त्यांचे उरले भग्न अवशेष
जलात बुडवून तो इतिहास
अजून नाईल वाहतेच आहे
\