हरभरे-कांदापात उसळ

  • पातीचे कांदे १२
  • मोड आलेले हरभरे २ वाट्या
  • बेडेकर संडे मसाला ३ चमचे
  • तेल तीन पळ्या
  • गार्लिक सॉल्ट चवीनुसार
  • लिंबू-कोथिंबीर (ऐच्छिक)
४५ मिनिटे
तीन जणांना पोटभर

कांद्याची पात बारीक चिरून घ्यावी.

तेल कढईत तापवावे. ते धुरावल्यावर ज्योत बारीक करून चिरलेली कांद्याची पात घालावी. लगेच बेडेकर संडे मसाला घालून ज्योत मोठी करावी आणि परतत रहावे.

पात जराशी जळकटल्याचा वास आल्या आल्या हरभरे टाकावेत आणि पटापट हलवत रहावे.

दोन मिनिटांनी गार्लिक सॉल्ट घालावे आणि ज्योत बारीक करावी. (गार्लिक सॉल्ट पुण्यात 'दोराबजी'मध्ये मिळते)

मिश्रण हलवत रहावे. आठ वाट्या पाणी उकळवावे आणि मिश्रणात घालून सारखे करावे.

ज्योत मोठी करावी आणि रटरटा शिजवावे.

हरभरे नीट शिजल्यावर ज्योत बंद करावी. आवडत असल्यास वरून लिंबू पिळून बारीक चिरलेली कोथिंबीर भुरभुरवावी.

सोबत तेल लावलेली घडीची पोळी वा ज्वारीची ताजी भाकरी असावी.

पातीशिवायचे उरलेले कांदे 'विनेगर'मध्ये घालून मुरवल्यास उपयोगी येतील.

स्वप्रयोग