माणिकमोती

  • भिजवलेला साबुदाणा - अडीच वाट्या (साधारणतः ४ तासाने साबुदाणा नीट भिजतो)
  • दाण्याचे कुट - ६ चमचे
  • मीठ, साखर - चवीनुसार
  • हिरवी मिरचीचा खर्डा-चवीनुसार , बारीक चिरलेली वाटीभर कोथिंबीर
  • कच्चा किसलेला बटाटा - १ मध्यम आकाराचा
१० मिनिटे
६ थालीपाठे


सर्वप्रथम सगळे साहित्य एकत्र करावे. आवश्यक तितक्या पाण्याचा वापर करून सहा गोळे करून १० मिनिटे मुरू द्यावे.
एकीकडे तव्याला तेलाचा हात लावून घ्यावा आणि एका गोळ्याचे हळूवार हाताने गोलाकार थालीपीठ थापावे.
सुरूवातीला मध्ये थापावे म्हणजे मध्ये जाडसर राहत नाही व कडा बारीक थापत जाव्यात.
बोटाने  मध्याभागी एक आणि बाजुला ३-४ भोके करावीत, त्यामधे २ -२ थेंब तेल टाकावे व तापलेल्या गॅस वर तवा ठेवावा. त्यावर झाकण लावावे. ४ मिनीटानी चुऽऽर आवाज झाला की झाकण काढावे व सगळ्या बाजूनी थालीपीठ नीट सोडवून उलटून परत २ मिनीटे गॅस वर ठेवून नंतर  गरम गरम खायला द्यावे.
लोणी अथवा दह्याशी उत्तम लागते. उपवासाला केळ्याची कोशिंबीर यासोबत तोंडीलावणे म्हणून सुरेख लागते.

वरील साहित्यात ६ थालीपाठे होतात.
 

छान खरपूस भाजलेल्या थालीपीठामध्ये लालसर कुरकुरीत झालेले साबुदाणे माणकासारखे दिसतात तर पांढरट पारदर्शक साबुदाणे मोत्यांसारखे.. म्हणून याचे नाव माणीकमोती ठेवले आहे...

नव्या वर्षाच्या सर्व मनोगती आणि त्यांच्या कुटूंबीयाना मनः पुर्वक शुभेच्छा !!

घर