परतलेली अळंबी

  • मश्रूम - ५०० ग्रॅम
  • क्रश्ड मिंट लीव्हज - अर्धा चमचा
  • ओरेगॅनो - दीड चमचा
  • बेझल - एक चमचा
  • चीज स्लाईसेस ५ (शक्यतो 'स्लिम्झ' या ब्रँडचे)
  • मिरपूड - १ चमचा
  • ऑलिव्ह ऑईल - १ पळी
  • मीठ - चवीनुसार
१ तास
एकासाठी पोटभर

मश्रूम्स धुऊन बारीक चिरून घ्यावेत.

ऑलिव्ह ऑईल गरम करावे. त्यात बारीक चिरलेले मश्रूम्स टाकावेत. ज्योत मोठीच ठेवावी आणि पटापट हलवत राहावे.

मश्रूम्समध्ये तीन चतुर्थांशाहून जास्त पाणी असते. ज्योत मोठी असल्याने ते झरझर पाझरू लागेल. पण ते आळेपर्यंत ज्योत बारीक करू नये.

त्यात क्रश्ड मिंट लीव्हज, ओरेगॅनो, मिरपूड आणि बेझल घालून नीट हलवावे.

पाणी आळायला लागल्यावर चीज स्लायसेस घालून एकजीव करावे.

नंतर चवीनुसार मीठ घालावे. (सेलरी सॉल्ट असल्यास उत्तम)

सोबत ब्राऊन ब्रेडचे टोस्टेड स्लायसेस असावेत. तीन वा चार.

स्वप्रयोग