जगाच्या इतिहासात प्रथमच हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतातील २४०० पेक्षा अधिक गायक गायिकांनी एकाच वेळी, एकाच स्टेजवर सादर केलेला अवीट गोडीच्या गाण्यांचा सुमधुर, श्रवणीय सोहोळा म्हणजे 'अंतर्नाद'!
पुण्यातील एस. पी. कॉलेज मैदानात दिनांक १२ जानेवारी २०१० रोजी सायंकाळी ठीक ६ वाजता हा कार्यक्रम आहे.
ख्यातनाम मानवसेवा प्रणेते व आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकरजी यांच्या उपस्थितीत हा सोहोळा पार पडणार आहे.
सोहोळ्यात भाग घेणारे मुख्य गायक कलावंत म्हणजे शंकर महादेवन, राजन -साजन मिश्रा, चित्रा रॉय व मल्ल्याळम सिने पार्श्व गायिका गायत्री अशोकन असणार आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली गाणार असलेल्या इतर ख्यातनाम गायक गायिकांमध्ये अनुराधा मराठे, राजेश दातार अशा दिग्गजांची उपस्थितीही राहणार आहे.
२४०० गायकांपैकी अनेकजण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून आलेले असून सर्व गायक गायिका संगीत विशारद किंवा हिंदुस्तानी संगीताचे अभ्यासक आहेत.
ह्या विराट सोहोळ्याची नोंद गिनीज वर्ल्ड बुक ओफ रेकॉर्डस मध्ये होणार असल्याचे समजते. अशा प्रकारचा हा पहिलाच एवढ्या मोठ्या संख्येचा हिंदुस्तानी संगीताचा गानवृंद असेल.
कार्यक्रमाच्या प्रवेशिका बालगंधर्व रंगमंदिर, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह इत्यादी ठिकाणी उपलब्ध आहेत.
तरी गानरसिकांनी व हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत प्रेमींनी ह्या सुमधुर गानसोहोळ्याचा लाभ घ्यावा.