सुंदरी

जीवनाच्या त्या वळणावरची
ती सुंदरी अनोखी होती
ती अशी अविस्मरणीय
नक्षत्राचे चांदणे होती

तिच्या ओठवारती
गुलाब पाकळ्या होत्या
शब्दांची तर ती
सरस्वातीच होती

मोत्यासरखे दात
नाकाला धार होती
तिच्या रुपाची ती
वेगळीच कहाणी होती