'थर्टी फर्स्ट'

'थर्टी फर्स्ट' चा सण
आम्हीही साजरा केला
थोडीशी मस्ती
थोडा धिंगाणा केला

काय झाले जरी
नसेल हा आपला सण
आपण तर खुश होतो
खुश होते मन

कुणी जरी तरसेल
वर्षभर अन्नाला
त्यालाही म्हणू आम्ही
घ्यानाहो 'एकच प्याला'

विकत घेऊ आम्ही जग
का आहोत आम्ही भिकारी
असेल जरी कोठे
'आमुची दारू साठी उधारी'