रसभरी रसभाजी

  • २ कांदे चिरून, उकडून, पेस्ट करून
  • २-३ टोमॅटो उकडून, साली काढून, प्यूरी करून घेणे.
  • २ बटाटे उकडून, साली काढून चौकोनी मध्यम आकाराच्या तुकड्यांत चिरून
  • इतर भाज्या : मटार, फरसबी, फ्लॉवर इत्यादी वाफवून घेणे.
  • आले - लसूण पेस्ट अर्धा ते एक टीस्पून (आवडीनुसार)
  • गरम मसाला
  • दही/ क्रीम
  • चवीप्रमाणे मीठ, वरून पेरायला कोथिंबीर, तेल
३० मिनिटे
तीन ते चार माणसांसाठी

(चित्रावर टिचकी मारून चित्र मोठ्या आकारमानात पाहावे)

प्रथम तेलात कांद्याची पेस्ट व आले-लसूण पेस्ट व्यवस्थित परतावी. त्यात टोमॅटो प्यूरी व गरम मसाला घालून तेल सुटेपर्यंत परतावे. उकडलेल्या बटाट्याचे तुकडे वेगळे तांबूस सोनेरी परतून/ तळून घ्यावेत. ( अन्यथा तसेच वापरले तरीही चांगले लागतात. ) परतलेल्या मसाल्यात वाफवलेल्या इतर मिश्र भाज्या घालाव्यात, परतलेला बटाटा घालून मीठ, आवश्यकता वाटल्यास तिखट घालून पुन्हा जरा परतावे. थोडे पाणी घालावे व पुन्हा ढवळावे. सर्व पदार्थ व्यवस्थित शिजल्यावर वरून दही/ क्रीम घालावे व कोथिंबीर पेरून गरमागरम भाजी पोळी/ भाकरी/ ब्रेड/ रोटी/ फुलक्या बरोबर खायला द्यावी. भाताबरोबरही छान लागते.

ह्या भाजीत पनीर/ टोफ़ू तळूनही छान लागते. किंवा बटाटा/ दुधीचे कोफ्तेही सोडतात. तयार मुठिया मिळतात, त्याही छान लागतात. तसेच चव बदल म्हणून स्वीट कॉर्न, मश्रूम्स, सिमला मिरची ही वापरू शकता. ब्रोकोली, गाजर यांसारख्या भाज्याही वापरू शकतो.

आई