सुर्यस्ताला,
हातावर हात ठेवून
उगवणाऱ्या चंद्राच्या साक्षीनं
एकमेकांना जन्माचं बांधून घेतलं
शपथांनी !
पुढल्या संध्याकाळी पुन्हा शपथा
त्या, त्याच बंधनाच्या
आणि
तासन् तास दुरावलेल्या मनांचा
क्षणभरचा मिलाफ
आयुष्यभर मिळेल का हे सारं?
परंपरेतला हा समाज
नुसत्या नजरेनेच
तुझी माझी कशी
हेटाळणी करतोय् !