कढीपत्त्याची चटणी

  • जरा सुकलेली कढी पत्त्याची पाने- १०-१५
  • सुक्या खोबऱ्याचा खीस - पाऊण वाटी
  • गावरान तीळ- पाऊण वाटी
  • मिरच्यांचे तुकडे - मूठभर, मीठ चवी प्रमाणे, साखर चवीला
१० मिनिटे
३-४ जणांना

प्रथम एक दिवसभर कढी लिंबाची पाने धुवून, सुकवून घ्यावीत. नंतर कढईत तीळ, खोबरे कीस भाजून घ्यावे. ते वेगळया वाडग्यात काढून घेऊन, कढईत थोडे तेल घेऊन कढी पत्ता तळून घ्यावा, पाने थोडी चुरडून तीळाच्या मिश्रणात घ्यावीत, मिरचीचे तुकडेही तळून घ्यावेत. साखर-मीठ घालून हलक्या हाताने ढवळावे व ही कुरकुरीत ,चटकदार चटणी गरम आमटी भाताबरोबर खावी.

हवे असल्यास थोडे लाल तिखट घालू शकता.  वाळवायला वेळ नसल्यास ओल्या कढीपत्त्याची पण करता येईल.

स्वतः