तहानलेले मन माझे, कटाक्षासाठी
वाट पाहत डोळ्यातून, कटाक्ष देशील जरुर
येशील तू पुन्हा ओसरीवर, येते गं मी! म्हणत
हळूच बघत समोर ,नजरेला नजर देशील जरुर
हालताना झुळू झुळू वाऱ्याने, फुल तुझ्या ओसरीतले
आभास येण्याचा तुझा उत्पन्न करतात
झुळू झुळू करत झुळुक तशीच पुढे जाते
नजर मात्र तिथेच असते एकदा तरी दिसशील जरुर
सुपातील दाणे हातात घेऊन घोळत घोळत तू येते
शेंगांची टरफले झटकताना झर्रकन समोर पाहते
आली तशी तू सऱ्रकन निघूनही जाते
नजर माझी मात्र, तिथेच खिळून राहते
तिथेच खिळून राहते!