झटपट सार/कढण

  • हिरवे चणे उकडून झाले की उरलेले पाणी
  • फोडणी साठी तूप, जिरं, कडिपत्ता, ठेचलेले आले, मिरची
  • बारीक चिरलेली कोथिंबीर
  • ताक (थोडेसे आंबट हवे)
  • साखर
  • मीठ
१५ मिनिटे
अंदाजे

चना चटपटी किंवा चण्याची भाजी करण्यासाठी आपण हिरवे चणे उकडून घेतो व बहुतांशी त्याचे पाणी फेकून देतो. तसे न करता मी माझे डोके लढवून हे कढण try केले.

कृतीः

१) चण्याचे पाणी + ताक + मीठ + थोडी साखर असे एकत्र करून ठेवणे. चण्याचे पाणी व ताक यांचे प्रमाण आपल्या अंदाजाने घेणे. चण्याचे पाणी ताकापेक्षा जास्त हवे. ताक जास्त आंबट असल्यास साखर जरा जास्त घालणे.

२) साहित्यात दिल्याप्रमाणे फोडणी करणे

३) फोडणीमध्ये वर बनवलेले मिश्रण घालून ढवळणे. जरा दाटसर होऊ देणे.

४) उकळी आली की बारीक चिरलेली कोथिंबीर घालणे

अश्याच प्रकारे टोमॅटो चे सारही बनवता येते. फक्त चण्याच्या पाण्या ऐवजी उकडलेल्या टोमॅटो चा गर घ्यायचा.

स्वतः प्रयोग करून पाहिलेला प्रकार