सुधारस

  • साखर २ वाट्या
  • एक ते दीड लिंबाचा रस - गाळून
  • केशराच्या दोन चार काड्या
  • लवंगा दोन - तीन
  • काजू - बदामाचे काप ऐच्छिक
३० मिनिटे
पुरवाल तशी

सर्वप्रथम मंद आंचेवर साखरेचा ती भिजेल इतपत पाणी घालून एकतारी पाक तयार करून घ्यावा. पाक झाल्यावर त्यात केशर काड्या व लवंगा घालाव्यात. त्यात लिंबाचा रस घालून गॅस बंद करावा. वरून सजवायला आवडत असल्यास काजू - बदाम काप घालावेत. गार होऊ द्यावा. सुधारस तयार!

माझी आजी हा सुधारस फार सुंदर करायची. पोळी, ब्रेड बरोबर गोडाचे तोंडीलावणे म्हणून छान लागतो. किमान आठ - दहा दिवस तरी टिकतो. फ्रीजमध्ये जास्तच! अतिशय साधा, करायला सोपा व रुचकर पदार्थ!
ह्यात तुम्ही इतर फळांच्या फोडीही घालू शकता. ह्या फोडी शिजवून घ्याव्यात व सुधारस होत आला की त्यात घालाव्यात. सफरचंद, पीच, अननस अशी फळे वापरून तुम्ही ह्या सुधारसाची लज्जत अजून वाढवू शकता. मात्र फळे घातल्यास तो फार दिवस ठेवू नये. (तसा तो फार दिवस टिकतही नाही म्हणा! गट्टं स्वाहा होतो!! )

आजी