तुम्हाला मधुमेहाची चाहूल लागत आहे काय?

श्री रे डी. स्ट्रैंड, एम. डी. यांचे "व्हाट युवर डॉक्टर डझ नॉट नो अबाउट न्युट्रिशनल मेडिसिन मे बी किलींग यू" या मथळ्याचे पुस्तक माझ्या वाचनात आले त्यातील सिंसिसड् 'एक्स' याबद्दल ची माहिती मला सर्व वयातील व्यक्तींसाठी विशेषतः २५ वर्षावरील तरुण तरुणींनी अवश्य वाचावी अशी वाटल्या वरून मी ती यादुवा क्र. १ जालावर उद्धृत केली आहे. काही कारणास्तव रक्त तपासणी केल्यावर आपल्या ला मिळालेला लिपीड प्रोफाइल रिपोर्ट आपण कसा वाचावा आणि त्यावरून काय समजावे याची सोप्या भाषेत मांडणी लेखकाने केली आहे. मधुमेह व लठ्ठपणा हे दोन शत्रू सध्या तरुण पिढीच्या हात धुवून मागे लागले असताना त्याबद्दल ची माहिती आपणास असावी हा प्रामाणिक उद्देश ठेवून वरील जालावर अवश्य भेट द्यावी व त्यावर विचार करावा ही कळकळीची विनंती.