कोबी कांदा काकडी टोमॅटो सॅलड

  • चार कप किसलेला कोबी
  • एक कांदा बारीक चिरून
  • एक मध्यम आकाराची काकडी बारीक चिरून
  • एक टोमॅटो बारीक चिरून
  • चवीप्रमाणे मीठ, साखर, मिरपूड
  • एक ते तीन टेबलस्पून एगलेस मेयॉनीज
१० मिनिटे
चार माणसांसाठी

सर्व जिन्नस एका मोठ्या बाऊलमध्ये हलक्या हाताने एकत्र करावेत. मेयॉनीजचा वापर आपापल्या आवडीप्रमाणे अगर पथ्याप्रमाणे करावा. तयार सॅलड फ्रीजमध्ये गार करायला ठेवावे व गारच सर्व्ह करावे.

उन्हाळ्याच्या दिवसात दुपारी आपण अशा सॅलडला जेवणाचा प्रमुख भाग बनवू शकतो.

मैत्रीण