सुरक्षेचा घोळ

सुरक्षा कोणाची, कशी, केव्हा, कोणाच्या पैशाने? सगळा घोळ. सध्या घडत असलेले सुरक्षा नाटक वाटते. बेजबाबदार मीडिया २४ तास बातमी ह्या नावाचा काय दुरुपयोग आणि घोळ घालितं आहेत ते बघताना सुरक्षा कशाला म्हणतात हे कळेनासे झाले आहे.

वरळी सी लिंक किती व कशी असुरक्षित आहे, त्या करता किती दिवसात कोणती साधने बसवण्याचा प्रयत्न कसा सुरू आहे ..... ही बातमी म्हणून जगाला सांगणे. . . .  बिनडोक, बेजबाबदार.... सगळे चीड आणणारे. ऐन वेळेवर मोठी किंमत देऊन सबस्टॅंडर्ड काहीतरी बसवून घोळ घालणे व खिसे भरणे .... हे किती वेळा घडले, घडणार?

बुलेटप्रुफचा घोळ अजून निस्तरला नाही तोवर दुसरा घोळ सुरू झाला. आयपीएल खेळांना किती कंपन्या कशी सुरक्षा देणार हे जाहीर रित्या सांगण्यात काय शहाणपण व बुद्धीचा वापर केलात हो?

नक्ष्ल वादी २५ सुरक्षा कर्मींचा जीव घेऊन पळून गेले हे पण बातमी म्हणून नुसती चर्चा दाखवणे सुरू आहे. बंगाल सरकार सुरक्षा कर्मीयांना योग्य हत्यारे देऊ शकत नाही म्हणून माध्यमातून कबुली देतात. का ह्या सरकारी अधिकाऱ्यावर राष्ट्रद्रोहाची कलमे लावून तुरुंग कोठीत रवानगी झाली नाही?

हे मी विचारणे, ह्यावर भाष्य करणे माझा रक्तदोश आहे का हो?  का मी स्वप्नात बरळतो आहे?