म्या-न कवीच्या कविता

म्या-न कवीच्या कविता
प्रस्तावना: कविता  कवींनीच लिहाव्यात असे बंधन नाही यामुळे हे धाडस.
काही कविताः
१.
आटपाट नगरीतले
कवी इतके सोकावले
लिहिण्याआधी दुसऱ्यांच्या
वह्यांमध्ये डोकावले.
२.
कवीसंमेलनांमध्ये
कवी झाले इतके क्रुद्ध!
दोन-तीन गटांमध्ये
सुरू झाले टोळीयुद्ध
....
सूचनांचा, ताशेऱ्यांचा
सुरू झाला भडिमार
एक गट ओरडलाः
"गनिमाचा गडी मार! "
३.
कवितांच्या राज्यामध्ये
दहशतवादी घुसलेत
संधी कधी मिळेल याची
वाट बघत बसलेत
...
कवितांच्या राज्यामध्ये
इतके झाले बंड
कोण कवी कळेना
आणि कोण गुंड!
४.
म्या-न कवी
मी 'म्यान' कवी
थोर बाकिचे
'मान्य' कवी
....
नावच टोपण
काही कवींचे
बंदच टोपण
मम लेखणीचे
..
बंद टोपण ही
म्यान समशेर
म्या-न कवी
मी 'म्यान' सपशेल
...