महिलादिन?: स्त्रीच आहे शत्रू स्त्रीची!! पुरुष नाही.

८ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून जगभरात साजरा केला जातोय.

विविध कायद्यांच्या चर्चा होताहेत. पुरुषांविरूद्ध जास्तीत जास्त बोलले म्हणजे महिला दिन खऱ्या साजरा झाला असे समजले जात आहे. पण, पुरुष हे महिलांचे कधीच शत्रू नव्हते, नाहीत आणि यापुढेही नसणार आहेत.

महिलेची खरी शत्रू महिलाच असते.

स्त्रीयांचे एकमेकांतील नातेसंबंध बघितल्यास असे दिसून येते की, सासू-सून, नणंद-भावजय, जावा-जावा... याप्रकारची नाती सगळ्यात बदनाम नाती आहेत. टोकाच्या शत्रूत्त्वाची नाती आहेत.

नोकरी करून घरकाम सांभाळणाऱ्या सूनेला "समजून न घेणारी" ही सासूच असते. नवरा किंवा सासरा नाही.

हा जर जुन्या-नव्या पिढीचा वाद मानला, तर मग नणंद-भावजयीचे ही एकमेकांशी का पटत नाही? त्या तर एकाच काळातल्या असतात.

तसेच पुरुष हा स्त्री कडे उपभोग्य वस्तू म्हणून बघतो अशी ओरड केली जाते. ते खरे नाही. स्त्रीच बऱ्याच अंशी याला जबाबदार आहे. कोर्पोरेट क्षेत्रात काम करतांना  सौंदर्याच्या आधारे स्त्री आपली कामे करवून घेते. फॅशन शो मधल्या महिला सुद्धा लाजतील असे कपडे घालून महिला आजकाल ऑफिसला जातात, मुली कॉलेजला जातात.

महिलाच स्वत:ला अशा पद्धतीने पेश करत आहेत की  पुरुषांचा दृष्टीकोन  हा उपभोगाचाच राहील!!

पैसे मिळतात म्हणून महिलाच अश्लील चित्रपटात काम करतात, अश्लील जाहिराती करतात. त्यांना नको असेल तर त्या अशा जाहिराती नाकारू शकतात. अशा जाहिराती थांबवायच्या असतील तर कोणत्याच स्त्रीने अशा जाहिराती/चित्रपट नाकारल्या पाहिजेत. नाहितर याला दुटप्पीपणा किंवा दांभिकपणा म्हणावे लागेल. कारण आपल्याला वाटेल तसे स्वैर वागायचे आणि काही झाले की पुरुष आणि पुरुषप्रधान संस्कृतीला दोष देवून मोकळे..

आणि प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने समानता पाहिजे आणि आरक्षण पाहिजे. समानता पाहिजे असेल तर मग सवलत कशाला हवी? कारण कायद्यांबाबतही असमानता आहे. सगळे कायदे स्त्रीच्याच बाजूने आहेत.

आरक्षणामुळे आजकाल असे झाले आहे की, एखादा कुटूंबात पती-पत्नी दोन्ही कमावणारे, तर एखाद्या कुटुंबातल्या एकाही तरूणाला नोकरी नाही. नोकरी देतांना कंपन्यांनी हा विचार जरूर करावा.

महिलादिनानिमित्त स्त्रीयांनी पुरुषांचा विचार करावा आणि पुरुषांवरचा अन्याय दूर करावा.