शब्दबंध २०१०

स.न.वि.वि.
दरवर्षीप्रमाणे यंदाही "शब्दबंध" ही मराठी ब्लॉगलेखकांची ई-अभिवाचनाची सभा जून महिन्यात साकारणार आहे. शब्दबंधचं हे तिसरं वर्ष. २००८ च्या जून महिन्यात १० ब्लॉगलेखकांनी केलेल्या शब्दबंधच्या यशस्वी प्रयोगानंतर गेल्यावर्षी म्हणजे २००९ मध्ये ६ व ७ जून रोजी जागतिक स्तरावर शब्दबंध साकारलं होतं. स्काईपवरील ऑडियो कॉन्फ़रन्सच्या सहाय्याने ४ सत्रांमध्ये एकूण २९ ब्लॉगलेखकांचा अभिवाचन सहभाग, तर यांच्याव्यतिरिक्त सुमारे १० सदस्यांचा (एकूण सुमारे ३९-४० सदस्यांचा) श्रवण सहभाग झाला होता. यंदाही मराठी ब्लॉगलेखकांकडून शब्दबंधमध्ये अशाप्रकारचा सहभाग अपेक्षित आहे. शब्दबंधची सविस्तर उद्घोषणा शब्दबंधच्या अधिकृत ब्लॉगवर प्रकाशित करण्यात आली आहे. इच्छुक ब्लॉगलेखकांनी त्या उद्घोषणेत सांगितल्याप्रमाणे संपर्क करावा ही विनंती.
-शब्दबंध संपादक मंडळ