पहाटेच्या चांदण्यात...

पहाटेच्या चांदण्यात जशी रात्र ही  मुरली ..
डोळ्यात माझ्या आहे अजुनी, जी  स्वप्नं मी बघितली..

तुझ्या सहवासात जशी मी बहरून आज खुलते..

स्पर्शाने नव्हे  तर फक्त स्मरणेच  उमलतेय..

 एकटी मी चालतेय.. वाट तुझी बघू किती


भेटशील मला तू या आशे वर मी जगू किती..


जाताना तुला पाहिले नाही वळून कधी..

पुन्हा भेटण्याची शपथ झाली आता जुनी..

पाटीवरच्या रेषा आता आपल्या आठवणी..

पुसट होत जातील त्या कशांनो क्षणी...

उरेल माझी मी फक्त जेव्हा कधीतरी


तरीही वाट पाहिलं मी तुझी अधांतरी!!