हा! हा! हा!

"काय यार! सगळा घोटाळा झालाय. " अस्वस्थपणे येरझारा घालत विन्या बंड्याला म्हणाला.

"एवढा काय घोटाळा झाला? " बंड्या.

"मी बाप बनणार आहे. " विन्या उत्तरला.

"अरे यात काय घोटाळा? चांगलंच झालं की. ग्रेट! "

"तुझ्या नानाची टांग! गाढवा, माझ्या बायकोला कळलं तर केवढा तमाशा होईल"

*************************************************************

मुलींचे शॉर्ट स्कर्टस् पुरुषांना भलतेच विनयशील बनवतात.
... बसमध्ये शॉर्ट स्कर्ट घातलेल्या मुलीला ओलांडून एक तरी पुरूष पुढे जातो का?

*************************************************************

जांबुवंतरावांच्या लग्नाचा ५० वा वाढदिवस येणार होता. ऑफिसातल्या एकानं विचारलं "२५ व्या वाढदिवसाला तुम्ही काय केलं होतं? "

"मी बायकोला घेऊन हवाई बेटावर गेलो होतो"

"व्वा! मग आता काय करणार आहात? "

"तिला परत आणावे म्हणतोय"

**************************************************************

"अरे मी फक्त आठवड्यासाठी बाहेर गेलो होतो रेऽऽ" खंड्या कळवळून बंड्याला म्हणतो. "लवकर काम संपवलं. बायकोला एसेमेस केला की आज रात्रीच येतोय. तिच्या ओढीने पळत सुटलो. येऊन बघतो तर ती दुसऱ्याच्या मिठीत! काय अर्थ घ्यायचा रे ह्याचा? "

"सोप्पयं! तुझा एसेमेस तिला मिळाला नसणार"

***************************************************************

"काय लाईफ यार! लग्नानंतर ऑफिसला जाताना बायको बूट घेऊन यायची आणि टॉमी भुंकत घिरट्या घालायचा" विन्या मन्याला सांगत होता. "आता १० वर्षांनी टॉमी बूट आणून देतो आणि बायको करवादत भोवतीने फिरते"

"मग यात प्रॉब्लेम काय? तुला तीच सर्व्हिस १० वर्षानेही मिळत आहेच की"

****************************************************************

* मी वेळेची बचत केली तर नंतर ती व्याजासकट मिळते का?

* मी आधीच तुम्हाला हजारदा सांगितलंय की तीच तीच गोष्ट मी परत सांगत नाही

* कोणत्याही प्रिंटरला तीन महत्त्वाचे भाग असतात. पेपर जॅम झालेला ट्रे, ते सांगणारा स्क्रीन आणि चालू बंद होणारा लाल दिवा!

********************************************************************

लग्न झालेला पुरुषः "तुमच्याकडे 'पुरूषः घराचा खरा स्वामी' हे पुस्तक आहे का? "

सेल्सगर्लः "ते पाहा! काल्पनिक वाड्मयांचा विभाग तिकडे आहे"