फ़िश पेडिक्युअर

फिश पेडिक्युअर हा अजब प्रकार एका हायफाय सलोन/ब्युटिपार्लर च्या बाहेर लिहिलेला वाचला. खूप उत्सुकता निर्माण झाली. लगेच नेट वर माहिती वाचली. खरोखरच गमतीदार प्रकार आहे.नेटवर मिळालेली माहिती थोडक्यात खालील प्रमाणे.

एका टॅंक मधे गार्रा रूफा नावाचे छोटे दात नसलेले खूप मासे असतात. ह्यात आपण आपले पाय बुडवायचे. मासे आपल्या पायावरचे डेड स्किन टिश्यू खातात. त्यांना अगोदरच फूड कमी दिलेल असत जेणेकरून ते आपला पाय दिसताक्षणी त्यावर हल्ला करतील आणि अशाप्रकारे आपले पाय साफ आणि मुलायम होतील. हा प्रकार लक्झुरिअस समजला जातो. ह्यासाठी ६० डॉलर पडतात. वर नंतर सॅलोन वाले नॉर्मल पेडिक्युअर करून देतात.
लोकामध्ये हा प्रकार अगदी आवडता झाला आहे. माश्यांवर क्रूरता म्हणून ह्या प्रकारावर विरोध देखील आहे आणि ह्याने पायाला इंफेक्शन देखिल होऊ शकते हे सिद्ध झाले आहे.
ही पद्धत अमेरिकेत काही ठिकाणी  बंद पाडण्यासाठी प्रयत्न चालू आहेत . हजारो मासे सॅलोनचे मालक पाळतात , एक मासा ४डॉलरला, त्यामुळे त्यांचे खूप नुकसान होऊ शकते . पण हेच मासे वारम्वार वापरणे आणि त्यान्चे हाल करणे किती अयोग्य आहे. 
 पण  ह्याचा ट्रेंड अमेरिकेत जबरदस्त आहे म्हणे.
आपणापैकी कोणी हा प्रकार अनुभवला असेल किन्वा अजून काही माहिती असेल तर लिहावे. 
वेग्ळाच प्रकार वाटला म्हणून शेअर करवासा वाटला.   "something different" च्या नावाखाली काढलेला हा प्रकार असणार जो फारच हास्यास्पद आणि क्रूर वाटला. आपणास काय वाटते ?
आरती जोशी