आंबे डाळ

  • हरभरा डाळ १वाटी
  • कैरी १ मध्यम
  • ओल्या खोबरयाचा खिस अर्धी वाटी
  • फ़ोड्णीसाठी -: तेल ,हिंग, मोहरी,जिरे,कढीपत्ता,कोथींबीर,मीठ अंदाजे आणि आवडीनूसार.
  • आले१/२ इंच,हिरवी मिरची २
१५ मिनिटे
४ माणसांसाठी

कृती

१. हरभरा डाळ चार तास भिजवा, साधारण दोन वेळा स्वच्छ धुवून घ्या.
२. मिक्सरवर वाटून घ्या.वाट्ताना पाणी ठेऊ नका, शक्यतो कोरडीच वाटा.
३.फोडणीसाठी तेल गरम करा त्यात जिरे, मोहरी, हळद, हिंग, कढिपत्ता आणि हिरवी मिरची टाका व खमंग तडतडीत फोडनी करा आणि थंड करत ठेवा.
४.कैरी खिसून घ्या, ओले खोबरे खिसून घ्या , आले खिसून घ्या.
५.वाटलेल्या डाळीत कैरीचा खिस , आल्याचा खिस, खोबरयाचा खिस मिसळून घ्या आणि नंतर थंड फोडणी टाकून मिसळून घ्या.
६. चटणी तयार.

१. आवडीनूसार पदार्थ कमी जास्त करू शकता.

२. मी काळे मीठ वापरले.
आई