दोन दिवस सहलीचे
अगदी अविस्मरणीय आठवणींचे
हसण्याचे खेलन्याचे
अगदी दिलखुलास बागडण्याचे
निसर्गाच्या सुंदर रूपांनी सजलेले
मैत्रीच्या प्रेमळ बंधात वसलेले
बस मधल्या प्रवासात हरपलेले
रसाळ मैडम च्या सहवासात जगलेले
भिमाशंकरच्या धुक्यातले
ओझरच्या पाण्यासमोरचे
शिवनेरीच्या अंबरखान्याताले
लेण्याद्रीच्या पायऱ्यांवरचे
जोरजोरात गाणे म्हणण्याचे
'ब'कर्यान्ना चैलेन्ज देणारे
'अ'स्मानी सुल्तानी घोषणांचे
भीतीच्या भयानक लाटेमध्ये घाबरलेले
रूम मधल्या टी व्ही सोबत केलेल्या जागरण चे
bus मधल्या सीट वरून होणाऱ्या भांडणांचे
खरेदीच्या नादात जेवण विसरलेले
झोपेच्या अधिपत्याने आवरायचे राहिलेले
आनंद होते भिजण्याचा, शेतामधल्या पाण्यातला
नंतरचा वेळ होता, रसाळ मैडम सोबतच्या गप्पांचा
पुरत नसली तरी तशीच जागा पुरवण्याचा
पुरीच्या तेलामधील (अति ) गोड शिऱ्याचा
वाटत नव्हते परत यावे
तरी परतावे ते लागलेच
बाय, गुड नाईट, स्वीट ड्रीम्स म्हणत
घरी सारे परतले
कसा हा वेळ पटकन जातो!
कधी येतो? कधी घडतो?
कधी जातो? कसा जातो?
कसाही गेला तरी भरपूर आनंद देऊन जातो!!!!!