गेल्या १-२ वर्षा मध्ये जागतिक तापमान वाढीबद्दल बराच उहापोह करून झाला आहे, कदाचित पुढे होत राहणारच. त्याचे परिणाम हळूहळू सर्व जन थोड्या जास्त प्रमाणात भोगत आहेतच. पण तापमान वाढीबद्दल ऐकायचं आणि पाहायचा....त्याच्या पुढे काय ???
मला माहिती आहे तुम्हाला वाटत असेल आता मी वेगळं असं काय बोलणार आहे???
गोष्ट छोटी आहे. माझं गाव बीड जिल्ह्यामधले. छोटेसे. गावात एक छान तळे आहे. नेहमीच भरलेले असायचे. गावाला पाण्याची कधीचकमतरता नाही जाणवली. कितीही मोठे लग्न असो की कितीही मोठा कार्यक्रम असो, पाण्याची सर्व गरज या तळ्यानिच भागवली. पणआवेळी पावसाने, तर कधी पाऊसच ना पडल्याने, आणि भयानक उन्हा मुळे, एक दिवस ते तळे पूर्ण पणे कोरडे पडले. आटा कुठे लोकांनाखरी जाणीव व्हायला लागली होती वातावरणतल्या बदलाची....
लोकही विचार करू लागले, पण उपाय काय ???
पाण्याचा योग्य आणि हवा तेवढाच वापर होऊ लागला होता. घाटावरचं पाणी अडवण्याच्या योजना योजीलया जाऊ लागल्या. झाडेलावण्यासाठी सुद्धा योजना योजीलया जाऊ लागला.....
पण उशिरा का होईना पावसाने हजेरी दिली. २-३ दिवसात पावसाने असा काही जोर धरला की २-३ दिवसातच गावातले तळे पूर्ण पणेभरून गेले.
पुन्हा पाण्याचा अती वापर... बंधारे बांधणे आणि झाडे लावण्याच्या योजना कागदावरच राहिल्या...!
आता उन्हाळ्याच्या शेवटी तळे कोरडेच राहते, पण पुन्हा उशिरा का होईना पाऊस हजेरी लावतोच.. आणि पुन्हा जैसे थे अवस्था..! हे चक्रअसाच सुरू राहतं.
लोक दिवसा पुढे दिवस फक्त ढकलत आहेत.
**** २-३ दिवस पुण्यासारखे शहर भयानक तापले. फॅन आणि एसी बंद करण्याच्या कल्पनेने सुध्डा लोकांना घाम फुटू लागला होता.. अचानक वातावरण ढगाळ बनले, कुठे कुठे रिमझिम रिमझिम पाऊस सुद्धा पडला.
पुन्हा गरमीचा तडाखा सुरुच...
वातावरण नक्कीच बदलत आहे...
***** माझ्या भावाने या वातावरणा कडे पाहून एकदा म्हणाला... एक दिवस नक्की येईल जेव्हा टीवी वर weather report मध्ये सांगतील... उद्या सकाळी हलका पाऊस पडेल, दुपारी कडाक्याचे उन असेल, संध्याकाळी जोरदार पाऊस असेल, रात्री बर्फ वृष्टी होण्याची शक्यता आहे.
हे बदल पाहताणी एक नक्की वाटतं ... मनुष्याने प्रगती केली की निसर्गाची अधोगाती... ???
किती तरी प्रमाणात प्राणी/पक्षी नामशेष होत आहेत. या पृथ्वी वर नक्की राहण्याचा अधिकार कोणाला ??? मनुष्य जी वाट लावत आहे,ती कुठे तरी थांबायलाच हवी...
त्या साठी काहीतरी करणे गरजेचे आहे... निदान एक सुरूवात तरी करणे गरजेचे...----